اگلا


‘हिमालय पुत्र’ राहणार बिना लग्नाचा | Bollywood Latest News | Latest Marathi News

0 مناظر
Makestube
17
پر شائع ہوا۔ 07/17/22 / میں لوگ اور بلاگز

‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूरावला आहे. ‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला. सध्याच्या घडीला बी-टाऊनमधील लोकप्रिय अविवाहित अभिनेत्यांच्या यादीतही त्याच्या नावाचा समावेश होतो. या यादितील त्याचे हे नाव शेवटपर्यंत तसेच राहण्याची चिन्ह आहेत कारण, अक्षयने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने याविषयी सांगितले. ‘कोणतेही नाते वर्षानुवर्षे टिकते यावर माझा विश्वास नाही’, असे त्याने मुलाखतीत स्पष्ट केले होते. ‘काही काळासाठी कोणा एका व्यक्तीसोबत असावे आणि त्यानंतर ज्यानेत्याने आपल्या आयुष्याच्या वाटा धराव्यात या विचारसरणीचा मी आहे’, असेही त्याने सांगितले होते. ‘लग्न किंवा कोणत्याही नात्यात ‘कमिटमेंट’ आणि नात्यातील बंधनांचा विषय येतोच. त्यामुळे आपल्याला अशा कोणत्याच बंधनात अडकून पडायचे नाही’, असे तो म्हणाला होता. आपण एखाद्या व्यक्तिसोबत रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो, पण त्याच व्यक्तीसोबतचे नाते अखेरपर्यंत टिकू शकेल याची मात्र काहीच खात्री नाही, अशाच मतावर तो ठाम आहे. नाती, लग्न याविषयी असणाऱ्या या वेगळ्या दृष्टीकोनामुळेच अक्षयने कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

مزید دکھائیں
0 تبصرے sort ترتیب دیں

اگلا