श्रद्धा कपूरचा झाला बाहुबली | Bollywood Latest News | Lokmat Latest News | Marathi Latest News
0
0
0 意见
बाहुबली आता पर्यंत प्रदर्शित झालेल्या अनेक सुपर डुपर हिट आणि कमाईचे अनेक उच्चांक गाठणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. बाहुबली मधील प्रभास चा अभिनय कोणीही विसरू शकणार नाही. बॉलीवूड मधून मिळालेल्या माहितीनुसार प्रभास चा नवा चित्रपट येतोय ज्याच नाव आहे ‘साहो’ आणि ह्या चित्रपटाची नायिका बॉलीवूड मधून असणार आहे. आधी माहिती मिळाली होती कि साहो ची नायिका अनुष्का शेट्टी असेल, परंतु आता निश्चित झाले आहे कि प्रभास ची नायिका श्रद्धा कपूर असेल. साहो चित्रपटासाठी फक्त अनुष्काच नाही तर कॅटरीना कैफ, सोनाक्षी सिन्हा आणि दिशा पटानी सुद्धा रांगेत होत्या. साहो ह्या चित्रपटाचा बजेट अंदाजे 150 कोटी असेल, हा चित्रपट हिंदी, तेलगु,मल्याळम, आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होईल.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
显示更多
0 注释
sort 排序方式