التالي


पाकिस्तानचा भारता विरुद्ध नवा डाव | Pakistan Latest News | Lokmat Latest News

1 المشاهدات
Makestube
17
نشرت في 08/26/22 / في

अयोध्येतील राम मंदिर बांधण्यात पाकिस्तानकडून अडथळे आणले जात आहेत. 2005 मध्ये राम जन्मभूमीवर ‘लष्कर ए तोयबा’ने केलेला हल्ला त्या अडथळय़ाचाच एक भाग होता, असा आरोप शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष सईद वसिम रिझवी यांनी केला आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून या प्रकरणात लक्ष घातले जात असून ते मुद्दामहून यात अडथळे आणत आहेत, असा आरोप करून रिझवी पुढे म्हणाले की, 2005 मध्ये लष्कर ए तोएबाने त्यामुळेच राम जन्मभूमीवर हल्ला केला होता, असे ते म्हणाले. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर प्रश्नावर मध्यस्थीसाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला असतानाच रिझवी यांनी नवीन तोडगा सुचवला होता. रिझवी यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला राम मंदिर वादाविषयी प्रतिक्रिया दिली होती.आम्ही अन्य पक्षकारांशी चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानुसार अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असे त्यांनी सांगितले होते. भारतात शांतता आणि बंधुत्वाची भावना कायम राहावी, यासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी सांगितले होते.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

أظهر المزيد
0 تعليقات sort ترتيب حسب

التالي