Sljedeći


अभिनेता शाहरुख खान यांनी केला करार पहा हा व्हिडिओ | Shah Rukh Khan Latest News

5 Pogledi
Makestube
17
Objavljeno na 07/26/22 / U Ljudi i blogovi

भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन स्ट्रिमिंगचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी 'ऍमेझॉन' आणि 'नेटफ्लिक्‍स' या दोन्ही बड्या कंपन्या प्रयत्नशील आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या भारतीय भाषांमधील कलाकृतींवर भर देत आहेत. 'येत्या काही महिन्यांतच भारतीय भाषांमधील कलाकृती सादर करण्यासाठी भरीव गुंतवणूक केली जाईल', असे 'नेटफ्लिक्‍स'ने गेल्या महिन्यातच जाहीर केले होते. 'नेटफ्लिक्‍स' या व्हिडिओ स्ट्रिमिंग सर्व्हिसने बहुभाषिक मालिका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान याच्या 'रेड चिलीज' या कंपनीशी करार केला आहे. बिलाल सिद्धिकी या भारतीय लेखकाच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या कादंबरीवर ही मालिका आधारित असेल. <br /><br />'नेटफ्लिक्‍स'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिड हॅस्टिंग्ज भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शाहरुख खानची भेट घेतली. बिलाल सिद्धिकी यांच्या पुस्तकावर आधारित ही मालिका आठ भागांची असेल. या मालिकेचे चित्रिकरण विविध ठिकाणी केले जाणार आहे. या मालिकेत हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि इतर काही भारतीय भाषांचा समावेश असणार आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Prikaži više
0 Komentari sort Poredaj po

Sljedeći