Up next


तर आता चीनला मिळणार हा मान | China Latest News | Lokmat Marathi News

7 Views
Makestube
17
Published on 07/26/22 / In People & Blogs

चीन येत्या पाच वर्षामध्ये जगातील सर्वात मोठा आयातदार देश ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका चिनी गुंतवणूकदार संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. आयातीच्या बाबतीत चीन पाच वर्षामध्ये अमेरिकेला मागे टाकेल, असे या संस्थेने आपल्या अहवालात नमूद केले आहे. गेल्या दहा र्वषमध्ये चीनच्या आयातीचे प्रमाण दरवर्षी ६ टक्क्यांनी वाढले आहे. हे प्रमाण अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे चीनच्या एका वृत्तसंस्थेने वृत्तात म्हटले आहे.<br /><br />चीन आणि अमेरिका जगातील दोन मोठे आयातदार देश आहेत. या दोन देशांमधील आयातीमधील तफावत 2018 मध्ये कायम राहिल्यास आणि पुढील वर्षामध्ये अमेरिकेच्या आयातीमध्ये दरवर्षी 0.15 टक्क्यांनी घट झाल्यास 2022 पर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा आयातदार देश होऊ शकतो, असे चायना इंटरनॅशनल कॅपिटल कॉर्पोरेशनने (सीआयसीसी) अहवालात म्हटले आहे. या वेगाने चीनची आयात वाढली नाही, तरीही 2025 पर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा आयातदार असेल, असेही सीआयसीसीने म्हटले आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Show more
0 Comments sort Sort By

Up next